Pune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?
Pune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पुण्यात वर्दीवर
विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न आता संपूर्ण राज्याला पडलाय. पुण्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra News) पुन्हा एकदा हादरला आहे. पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोलओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्णच नव्हेतर अवघापुरता हादरून गेला आहे. फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल (शुक्रवारी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका वाहनचालकाना केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.