(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani Rain Update : परभणी, नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस! नदी-नाल्यांना पूर
Parbhani Rain Update : परभणी, नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस! नदी-नाल्यांना पूर
ही बातमी पण वाचा
Hingoli: हिंगोलीत पावसाचा कहर, पुरात 9 जण अडकले, बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाचारण, उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला पत्र
Hingoli flood: मराठवाड्याला हवामान विभागाने अलर्ट दिल्यापासून हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसाने पूर परिस्थिती ओढवली असून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नऊ जण अडकले आहेत. जिल्हास्तरावरील बचाव पथक गावात गेले असले तरी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. यासाठी एसडीआरएफ चे पथक व हेलिकॉप्टर तात्काळ पाठवण्यात यावे असे पत्र हिंगोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाला पाठवलंय.
काल रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सावरखेडा येथे चार, औंढा येथे तीन तसेच हिंगोलीत तीन नागरिक अडकले आहेत. जिल्हास्तरावरील पथकाने शोध घेतला असता तरी पूर परिस्थिती पाहता जिल्हा करता बचाव पथकासह हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे.
स्कूलबस पाण्याखाली, घरात गुडघाभर पाणी
हिंगोलीत पावसाने चांगलीच दणादण उडवली असून स्कूलबस पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. नद्या नाले ओढे ओसंडून वाहत आहेत. रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्याने रस्ते दिसेनासे झाले आहेत. जिल्ह्यात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून बचाव पथक तसेच प्रशासन पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढणे अवघड होऊन बसलंय. नदी, नाल्यांना पूर आल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. या भागात परिस्थिती गंभीर असून नुकसान पाहणीसाठी प्रशासनाकडून आढावा घेतला जातोय.