एक्स्प्लोर
OBC Quota Row : 'हे तो फक्त झाकी है, अजून बहुत कुछ बाकी है', Nagpur मध्ये सरकारला इशारा
नागपूरच्या संविधान चौकात आज सकल ओबीसी समाजाने विराट महामोर्चा काढला, ज्यामध्ये २ सप्टेंबरच्या शासन निर्णयाला (GR) तीव्र विरोध करण्यात आला. या मोर्चात विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. 'जर हा काळा जीआर रद्द नाही केला तर या सरकारला ओबीसींच्या अनुयायांना बळी पडावं लागेल,' असा थेट इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात वाटेकरी केल्यास ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करत हा जीआर तत्काळ रद्द करावा, ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. सुमारे अडीच किलोमीटर पायी चालत हा मोर्चा संविधान चौकात पोहोचला, जिथे त्याचे सभेत रूपांतर झाले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















