Pankaja Munde on Sanjay Rathod | सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालू नका : पंकजा मुंडे
मंबई : आपण राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो आणि या राज्यात पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणं नेत्यांकडून प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी आहेत. फक्त आणि फक्त सरकार, युती टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातलं जात आहे असा नाराजीचा सूर आळवत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan Case) प्रतिक्रिया दिली. मुंबईत एका पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला खरा, पण सदर प्रकरणात राजीनामा देण्यात दिरंगाई झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय यावेळी त्यांनी सध्याच्या प्रसंगाची पार्श्वभूमी आणि संदर्भ घेत धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या काही गंभीर आरोपांच्या धर्तीवर त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं म्हणत जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य आणि अपेक्षित त्या मार्गानं होण्यासाठी त्या आग्रही दिसल्या. सोबतच सदर प्रकरणी पूजा चव्हाणची ओळख जाहीरपणे सर्वांसमोर आणली गेल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला.
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)