(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Munde on Dasara Melava 2021 : यंदा सावरगावात दसरा मेळावा होणार : पंकजा मुंडे
दरवर्षी भगवान बाबाच्या जन्मगावी पंकजा मुंडे दसरा मेळावा घेतात याहीवर्षी दसऱ्याला त्या सावरगाव ला जाणार आहेत आणि दसरा मेळावा ही घेणार आहेत अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे आज सावरगाव मधल्या भगवान भक्ती गडाची पहाणी पंकजा मुंडे यांनी केली.भगवान बाबा यांच्या जन्म गावी यंदाचा दसरा मेळावा होणार. त्याचीच पाहणी करण्यासाठी मी आज सावरगाव येथे गेले होते. संपूर्ण परिसराचा आढावा घेतला. कोरोनाच्या मुळे गतवर्षी मला ऑनलाईन दसरा मेळावा घ्यावा लागला होता. त्यावेळी पोलिसानी गुन्हा देखील दाखल केला होता.मंदिर खुले होतील असे मी आता गुड न्यूज ऐकली आहे. मात्र सरकारचे नियम बदलतील का हे आम्ही पाहतोय. तरीही मी दर्शनाला जाणार आहे. दर्शनाला जाण्यासाठी कुठलीही बंदी नाही. भगवान बाबा आणि मेळाव्याला जोडले गेले सर्व भक्त आणि भाविक दर्शनासाठी येतील. अंस मत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले