(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2021 : आषाढी वारीसाठी आज दोन पालख्यांचं प्रातिनिधीक प्रस्थान
पुणे/औरंगाबाद : यंदाच्या आषाढी वारीवर (Ashadhi Wari 2021) कोरोनाचे सावट आहे. याच सावटाखाली देहूत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज (1 जुलै) प्रस्थान होईल. तर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं औरंगाबादच्या पैठणमधून प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान होणार आहे. मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बाहेरुन एक ही वारकरी देहूनगरीत येऊ नये, म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
वारकरी संप्रदायाचा सर्वात सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे
देहूत आज सकाळपासूनच मंदिरात विधीवत पूजाअर्चा सुरु आहे. दुपारी दोन वाजता तुकोबारायांच्या पालखीचं प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान होईल. त्यानंतर 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील.