एक्स्प्लोर
Kolhapur Panchganga : प्रदूषण कमी, अहवालात हमी
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणात घट झाल्याची दिलासादायक माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) अहवालातून समोर आली आहे. ‘देशातील दहा प्रदूषित नद्यांमध्ये समावेश असलेली पंचगंगा नदी आता सर्वसाधारण प्रदूषित श्रेणीत आली आहे,’ असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकेकाळी देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगेचा दर्जा सुधारला असला तरी, महाराष्ट्रातील ५४ नद्या अजूनही प्रदूषित असल्याची नोंद याच अहवालात आहे. कृष्णा नदीचाही 'साधारण प्रदूषित' नद्यांमध्ये समावेश आहे. पंचगंगेचे प्रदूषण कमी झाले असले तरी, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची जबाबदारी आता अधिक वाढली असून, भविष्यात नदी पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्याचे आव्हान कायम आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion















