Pakistan Terror Chavani : पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अनेक छावण्या, भारत शेवटचा घाव घालणार?
Pakistan Terror Chavani : पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अनेक छावण्या, भारत शेवटचा घाव घालणार?
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताने घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan Economy Crisis) मोठ्या संकटात सापडली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात (Pakistan Stock Exchange) मोठी घसरण झाली आहे. अवघ्या काही दिवसांत पाकिस्तानच्या शेअर बाजाराला सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात विविध पातळ्यांवर कठोर पावलं उचलली आहेत. द्विपक्षीय व्यापार थांबवणे, सिंधू पाणी वाटप करार निलंबित करणे, सार्क वीजा सवलतीचा लाभ रद्द करणे, पाकिस्तानी लष्करी सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश आणि अटारी वाघा सीमेवरील वाहतूक थांबवणे असे निर्णय भारताने घेतले.






















