एक्स्प्लोर
Raj Thackray Speech : ठाकरेंनी दाखवला पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ, सरकारवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'कीस सरकारने आपको बिघाडलंय? कोण आपके मालिक है?', असा थेट सवाल नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना निवडणूक आयोगाला विचारला होता. आसाममधील एका भाषणात त्यांनी बंगाल, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आयोग रिगिंग आणि हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप केला होता. आता याच भाषणाचा आधार घेत विरोधक सध्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका करत आहेत. मोदी त्यावेळी जे बोलले होते, तेच आम्ही आज सांगत आहोत, असे म्हणत विरोधकांनी, 'तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात' अशा शब्दांत आयोगाला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली आहे. यावरून महाराष्ट्रासह देशभरातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















