एक्स्प्लोर

Nitin Gadkari : छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर होते

Nitin Gadkari : छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर होते

 नितीन गडकरींचं वक्तव्य; “छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर होते, त्यांनी…” छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.   प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. The Wild Warfront असं यातल्या एका पुस्तकाचं नाव आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज हे १०० टक्के सेक्युलर होते असं वक्तव्य केलं आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार कसा चालत असे यावरही भाष्य केलं आहे.  काय म्हणाले नितीन गडकरी? मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजी भाषेत येतं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा इतिहास, कार्य कर्तृत्व याबाबत महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. मी इतकंच सांगेन लहानपणपासून आमच्या आई वडिलांहूनही जास्त स्थान आमच्या हृदयात ज्यांच्याबाबत होतं त्या व्यक्तीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज असं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते. रामदास स्वामींनी त्यांचं यथार्थ वर्णन केलं आहे, यशवंत, किर्तीवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी. प्रत्येक गोष्टीत आदर्श कुणी असेल तर ते शिवाजी महाराज. एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते उत्तमच होतं. अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर जेव्हा भेट झाली. अफझल खानाने छत्रपती शिवरायांवर वार केला ज्यानंतर महाराजांनी खानावर वार केले. यामध्ये अफझल खानाचा मृत्यू झाला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा असे आदेश त्यांनी दिले. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणं हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे १०० टक्के सेक्युलर होते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या त्यावेळी ते सन्मानाने वागले. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्यासमोर आणली गेली तेव्हा ते म्हणाले की अशीच सुंदर अमुची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. तिला त्यांनी सन्मानाने घरी पाठवलं. महिलांचा आदर, प्रशासनात कठोर प्रशासक, लोकांसाठी संवेदनशील राजा आणि वेळ आल्यानंतर आपल्या मुलालाही शिक्षा करताना त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. आजच्या काळात ही शिकवण आवश्यक आहे. कारण आजकाल अनेक लोक आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तिकिट मागत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हेच होतं की राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.  इंग्रजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टी लिहिल्या गेल्या-गडकरी इंग्रजांच्या काळात जो इतिहास लिहिला गेला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनेक अशा गोष्टी समोर आल्या होत्या ज्या चुकीच्या आणि गैरसमज पसरवणाऱ्या होत्या. लुटारु असाही त्यांचा उल्लेख केला गेला. रयतेचं राज्य ही संकल्पना त्यांनी आणली होती. त्यांनी शौर्य आणि पराक्रम यांचा इतिहास रचला हे वास्तव आहे. शाहिस्तेखान अडीच लाखांचं सैन्य घेऊन पुण्यात आला होता. त्याला २० ते २५ जणांनी मिळून पळवून लावलं आहे. असा इतिहास असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार, त्यांचे मावळे, त्यांचे सरदार या सगळ्यांनाच प्रेरणा देण्याचं त्यांनी केलं. राष्ट्रासाठी प्राण अर्पण करण्याचं काम या योद्धांनी केलं. स्वराज्य मिळाल्यानंतर त्याचं रुपांतर सुराज्यात करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्शवत असं काम केलं आहे. आज आपल्या शासनपद्धतीतही छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं जातं असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुन बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुन बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
Sanjay Shirsat: मी 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
मी 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचित पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचित पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
Weather Update: सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Protest: विधानभवनाजवळ तरुणाचे झाडावर चढून आंदोलन, Police आणि Fire Brigade घटनास्थळी दाखल
TOP 100 Headlines : 12 PM : सुपरफास्ट बातम्या : Maharashtra Politics : 25 OCT 2025 : ABP Majha
Shivsena vs Shivsena : 'जंजीर में जकडा राजा मेरा अब्बी भी सत्ते भारी है', ठाण्यात Uddhav Thackeray गटाची Mahayuti विरोधात बॅनरबाजी
Borivali News : पबमधल्या Party नंतर वाद, मित्रानेच तरुणीला Car च्या Bonnet वरून फरफटत नेले
Sindhudurg Crime : कणकवलीमध्ये साळीस्तेमध्ये सापडलेला मृतदेह बंगळुरुतील रहिवाशाचा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुन बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुन बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
Sanjay Shirsat: मी 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
मी 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचित पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचित पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
Weather Update: सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
Shreyas Iyer Injury : मागे पळत सूर मारुन झेल पकडला, पण श्रेयस अय्यर जोरात आपटला, रडत रडत सोडलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा Video
मागे पळत सूर मारुन झेल पकडला, पण श्रेयस अय्यर जोरात आपटला, रडत रडत सोडलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा Video
Phaltan Crime Doctor Death: बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत, सुरेश धस मैदानात उतरले, म्हणाले, 'तो' खासदार आणि त्यांच्या पीएला...
Mumbai Crime News: ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने 'ती'च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गेली, पण...; काळाचौकी परिसरात नेमकं काय घडलं?
ब्रेकअपनंतर भेटले, संतापलेल्या सोनूने 'ती'च्यावर केले वार, नर्सिंग होममध्ये जीव वाचवण्यासाठी गेली, पण...; काळाचौकी परिसरात नेमकं काय घडलं?
Phaltan Doctor Case: गेंड्याच्या कातडीविरुद्ध पाच महिन्यांपासून एकटी लढली, दोन अर्ज DYSP ला, एक अर्ज जिल्हा रुग्णालयात, तरी न्याय झालाच नाही, अखेर दोरीला लटकली
गेंड्याच्या कातडीविरुद्ध पाच महिन्यांपासून एकटी लढली, दोन अर्ज DYSP ला, एक अर्ज जिल्हा रुग्णालयात, तरी न्याय झालाच नाही, अखेर दोरीला लटकली
Embed widget