![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nitesh Rane on Sachin Vaze : सचिन वाझे मविआ सरकारचा जावई होता; आता आणखी नेते तुरूंगात जातील
Nitesh Rane on Sachin Vaze : सचिन वाझे मविआ सरकारचा जावई होता; आता आणखी नेते तुरूंगात जातील
हेही वाचा :
मुंबई पोलीस दलातून निलंबीत केलेले अधिकारी सचिन वाझे (Sachin vaze) याने महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघेल असा बॉम्ब टाकला. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सचिन वाझे याने गंभीर आरोप केले. सचिन वाझेने आरोप केल्यानंतर तासाभरातच अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझेचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टाने म्हटल्याचा दाखला देखील त्यांनी या वेळी दिला. ते नागपुरात बोलत होते. अनिल देशमुख म्हणाले, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील वाझेबद्दल बोलताना वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, असे म्हटले होते. दोन खुनाचा त्यांच्यावर गुन्हा आहे. त्यामुळे सचिन वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं देखील हायकोर्ट म्हणाले होते. सचिन वाझे याला हाताशी धरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत. अनिल देशमुखांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार सचिन वाझेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच पलटवार केला आहे. अनिल देशमुख म्हणाले, चार पाच दिवसांपूर्वी मी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र पाठवले होते. मी केलेल्या त्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप केला आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते माहीत नाही का? (सचिन वाझे) गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे. यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. परंतु त्याला हाताशी धरुन माझ्यावर आरोप लावत आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 06 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/c61fd6441f88b0ae70c6ef2c1cc5572317334715019891000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![CM Devendra Fadanvis Interview : मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/525b48f4911390c250d578fcb578555917334698767311000_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/b9130607f350c9f042100af2b8f7152017334695371341000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 6 डिसेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/00e90e350e4a025eb530a87d76528c0f17334692635411000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![RBI holds repo rate : रेपो रेट पुन्हा एकदा जैसे थे, 6.5 टक्क्यांवर रेपो रेट #abpमाझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/06/9f188297d5c4edf75365df88599099b717334687003041000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)