महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही. विरोधकांनी असेल बोलत राहावे, आमचं काम आम्ही करत राहू असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं.
Sanjay Shirsat on Sanjay Raut : विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही. विरोधकांनी असेल बोलत राहावे, आमचं काम आम्ही करत राहू असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं. संजय राऊतच्या (Sanjay Raut) म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण आमचं सर्व ठरलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवला. फडणवीस यांचांही मान राखल्याचे शिरसाट म्हणाले.
कालचा दिवस महत्वाचा होता. एवढा मोठा सोहळा महाराष्ट्राने पाहिला. जे सरकार त्यांना पाहिजे होतं ते पाहिलं आणि अनुभवलं आहे. काही लोकांना शंका होती की महायुतीत बिघाडी होती का? पण सर्वांना उत्तर मिळाल्याचे संजय शिरसाट म्हणाले. ज्यांना आमंत्रण देऊन देखील आले नाहीत, ते दुर्देवी लोक म्हणावे लागतील असे म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शपथ घेताच शिंदे यांच्या योजना चालू राहील असे फडणवीस यांनी सांगितल्याचे संजय शिरसाट म्हणाले. लाडक्या बहींणसाठी 2100 रुपये दिले जातील असेही संजय शिरसाट म्हणाले. सर्व आमदार शपथ घेतील, अध्यक्षा निवड होईल असे शिरसाट म्हणाले.
कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली
आमच्या सरकारची भूमिका सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती, आताही कुणावर अन्याय होणार नाही असे संजय शिरसाट म्हणाले. योजनेची छाननी केली म्हणजे कुणाला बाद केले जाणार नाही, चुकीचे कागदपत्रे दिले असतील त्यांची चौकशी होईल असंही शिरसाट म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार यांचा मान राखून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी कामं केली आहेत, ते सभागृहात असावे आणि आमच्यावर त्यांचा कंट्रोल असावे अशी मागणी होती असे एकनाथ शिंदे म्हणाले.
11 ते 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार
विशेष अधिवेशन झाल्यावर 11 ते 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, लवकर घोषणा होईल. थोडी कसरत करावी लागेल, अनेक सिनियर आहेत. निर्णय घेण्यासाठी नेत्यांना कसब दाखवावे लागेल.गैरसमज करु नका, कुणाला भेटण्यासाठी गेल्यास कुणाची वर्णी लागते असे नाही. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचा अधिकार आहे कुणाला मंत्रिपद द्यायचे याबाबतचा असेही संदय शिरसाट म्हणाले. गृहमंत्रीपदाचं आणखी ठरलं नाही, वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही संजय शिरसाट म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
