ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
आमचं हिंदुत्त्व सर्वसमावेशक, मुस्लीमही आमच्या हिंदुत्वात, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची माझाला पहिली मुलाखत
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीची बैठक, ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती
राज्यसभेत काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बेंचखाली नोटांची बंडलं, सभागृहात गदारोळ, सिंघवींकडून नोटा आपल्या नसल्याचं स्पष्टीकरण
काळ्या जॅकेटनंतर आज काळे मास्क, काँग्रेसचं संसद परिसरात अनोखं आंदोलन, मास्कवर 'मोदी अदानी भाई-भाई' असा मजकूर
एकनाथ शिंदेशिवाय शपथ घेण्याची तयारी भाजपने केली होती, संजय राऊतांचा आरोप, महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपने सुरु केलेलं सुडाचं राजकारण थांबवण्याचीही सूचना
रिझर्व बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम तर सीआरआर साडेचारवरुन चार टक्क्यांवर, महागाई नियंत्रणात ठेवण्यावर रिझर्व बँक भर देत असल्याचा दावा, मागील तीन वर्षातील विकास दरावरही समाधान
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीवर उसळला भीमसागर, राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला अभिवादन, दीक्षाभूमीवरही अनुयायांची गर्दी