NCP Ajit Pawar Candidate List :अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, 38 उमेदवारांचा समावेश
NCP Ajit Pawar Group Candidate List :
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, 38 उमेदवारांची पहिली यादी समोर
अजितदादांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महायुतीत अजित पवारांसोबत गेलेल्यांना पहिल्या यादीत स्थान.
उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.. अजित पवारांची उमेदवारी जाहीर होताच बारामतीत फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय.. बारामती हा पवारांचा गड मानला जातो.. मात्र यंदा पक्षफुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे बारामतीकर दादांच्या पारड्यात मतांचं दान टाकतात की मग पवारांच्या उमेदवाराला विजयी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान अद्याप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाहीये. त्यामुळे पवार बारामतीच्या मैदानात कुणाला उतरवतात? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)