एक्स्प्लोर
Navi Mumbai Airport Inauguration |नवी मुंबई विमानतळाचे उद्या उद्घाटन, तयारी अंतिम टप्प्यात
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या ठिकाणी पंचवीस हजार जणांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानतळाचा मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे. एक हजार शंभर साठ एकर जागेवर बनलेल्या या विमानतळासाठी एकोणीस हजार सहा शे पन्नास कोटींचा खर्च आला आहे. यात दोन धावपट्टे आणि चार टर्मिनल आहेत, जे एकमेकांशी जोडलेले आहेत. वर्षाला नऊ कोटी प्रवाशांची आणि दहा लाख टन कार्गो हवाई वाहतुकीची क्षमता या विमानतळाची आहे. पहिले उड्डाण डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















