एक्स्प्लोर
Vijay Chaudhari Marriage | महाराष्ट्र केसरी विजय चौधरी कोमल भागवतशी विवाहबद्ध | ABP Majha
ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि पोलीस उपअधीक्षक विजय चौधरी उद्या आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पैलवान विजय चौधरी आणि कोमल भागवत यांचा विवाह उद्या सायंकाळी पावणेसहाच्या मुहूर्तावर नाशिकच्या गंगापूरमध्ये संपन्न होणार आहे. विजयनं २०१४, २०१५ आणि २०१६ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेवर आपलं नाव कोरलं. याच कामगिरीनं त्याला मोठी लोकप्रियता आणि महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी मिळवून दिली. विजयची भावी पत्नी कोमल ही व्यावसायिक प्रकाश भागवत यांची कन्या असून, तिनं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















