Nashik Nature : डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्गाचं दृश्य समृद्धी महामार्गावरून
Nashik Nature : डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्गाचं दृश्य समृद्धी महामार्गावरून समृद्धीचे महमार्गाच्या इगतपुरी पासून पुढच्या टप्प्याचे लोकार्पण विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार आहे. घाटमाथा आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीचा हा परिसर असल्याने निसर्गाच वरदान या परिसराला लाभले आहे. नाशिक मुबंई महामार्गावरील कसारा घाट दरम्यानच निसर्ग सौंदर्य अनेकवेळा नागरिकांनी अनुभवले आहे. मात्र नव्याने सुरू होणाऱ्या समृद्धी महामार्ग परिसरातील निसर्ग सौंदर्य आपण पहिल्यांदाच एबीपी माझाच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. डोंगररांगा मधून नागमोडी वळणं घेत जाणार बोगदा, बाहेर आल्यावर मन प्रसन्न करणारा निसर्ग, हिरवा शालू पांघरलेला डोंगररांगा, त्यावर धुक्याची आल्हाददायक चादर आणि त्यातून कोसळणारे दुधी धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात, निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येकाला रममाण व्हावेसे वाटणारा ह्या निसर्गाच्या आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी