Narhari Zirwal News : 'मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो..',झिरवाळांची जोरदार फटकेबाजी
Narhari Zirwal News : 'मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो..',झिरवाळांची जोरदार फटकेबाजी
रायगड मधील कर्जत येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवाळ हे सुद्धा या संवाद मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी मी या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो अस मिश्किल विनोद करत उपस्थितांना त्यांनी हसवलं.मागील पाच वर्ष काळात राज्याच्या 288 आमदारांच सभागृह चालवलेला मी माणूस आहे. त्यामुळे कुठल्याही खात्याचा कार्यभार व्यवस्थित मी सांभाळू शकतो असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. यावेळी सर्वांना हसू आवरला नाही. राष्ट्रवादी पक्षात नेता कोणताही असो परंतु माझ्यासारखा सर्वसामान्य नेत्याच्या हातात जबाबदारी देणं ते सुद्धा नेत्या जवळ व्हिजन लागते आणि ते व्हिजन आमच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे आमच्या पक्षात कोण किती लहान आहे आणि ते कुठल्या समाजाचा आहे हे महत्वाच नसून ती किती कामाचा आहे हे महत्वाच आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















