Nana Patole Vs Aaditya Thackeray : नाना पटोलेंच्या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून केराची टोपली?
बुलेटीनच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतून मोठी बातमी..
पटोलेंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील-आदित्य
नाना पटोलेंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावे या पटोलेंच्या मागणीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया.
विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपलीय..
ठाकरे गटानं जाहीर केलेले विधानपरिषदेचे चारही उमेदवार आमच्याशी चर्चा न करता जाहीर केल्याचा आरोप पटोलेंनी केलाय.. नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधरचे उमेदवार मागे घ्या, असा निरोपही त्यांनी ठाकरेंकडे पाठवलाय..
पण यावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी पटोलेंची खिल्ली उडवली.. पटोलेंना आमचे प्रवक्ते उत्तर देतील असं आदित्य ठाकरे म्हणालेत..
पण उद्धव ठाकरेंनी माझ्याशी संपर्क साधला असून उद्यापर्यंत यावर तोडगा निघेल असं पटोले म्हणालेत..