Phone Tapping : अमजद खानच्या नावे 2017 साली नाना पटोलेंचा फोन टॅप झाल्याची सूत्रांची माहिती
मुंबई : राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचं प्रकरण गाजत असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅपिंग केल्याची माहिती समोर आली आहे. फक्त नाना पटोले यांचा फोन टॅपिंग केला नाही तर त्यांच्या जवळच्या आणखी तीन निकटवर्तीयांचे फोन टॅपिंग केल्याचं समोर आलं आहे. राज्यातील इतर नेत्यांचे फोन टॅपिंग होत असताना परवानगी न घेता फोन टॅपिंग केले होते मात्र नाना पटोले यांचा फोन टॅपिंग करत असताना ती परवानगी घेऊन केलेला आहे. मात्र ही परवानगी इतर नावाने घेऊन फोन टॅपिंग करण्यात आलेले आहेत. अमली पदार्थांची तस्करी करत असल्याच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ही परवानगी मागण्यात आली. त्यात नाव वेगळी मात्र मोबाईल नंबर नाना पटोले आणि त्यांच्या निकटवर्ती यांचा असल्याचं समोर आलं आहे.























