![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nagpur Solar Explosives company : बाजार गाव येथील कंपनीत स्फोटात 9 जणांचा मृत्यू, इमारत जमीनदोस्त
Nagpur Solar Explosives company : स्फोटात 9 जणांचा मृत्यू, ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी , कंपनीत स्फोट इमारत जमीनदोस्त
Nagpur News Updates: नागपूर : नागपूर (Nagpur News) अमरावती (Amravati) रोडवर बाजार गाव येथे ही कंपनीत आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, या स्फोटात मृतांचा आकडा वाढल्याची माहिती मिळत आहे. स्फोटात तब्बल नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. तसेच, या स्फोटात अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले आहेत.
नागपूर अमरावती रोडवरील (Nagpur Amravati Road) सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती आहे. तब्बल नऊ जण या स्फोटात मृत्यू झाला असून अद्यापही अनेकजण कंपनीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी आमदार अनिल देशमुख उपस्थित आहेत.
आमदार अनिल देशमुख म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी अपघात झालाय. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीच्या एका बिल्डिंगमध्ये मोठा स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
![Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/063ee86f1aa3ed59af0f8e4b72ffaa161719233134282976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Medha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/faaf2b8c3bbf2ab0721ad5455fd1e0691719231517897976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NEET Exam Scam : 'माझा'च्या प्रतिनिधीला 'नीट'चा आरोपी गंगाधरक़डून धमकावण्याचा प्रयत्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/6dd4d51323e68fe97f5e5cf11269f1b71719230967274976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/74520f5e7bb3b2a0454be5f279fdae581719229567998976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra MP Oath Ceremony : महाराष्ट्रातील नवनविर्वाचित खासदारांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/c5d914b0a9633e6a31b1d63a1a9bd93a1719228884823976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)