(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Letter To Amit shah : इथेनॉल निर्मिती बंदीवरून अजित पवारांचं अमित शाहांना पत्र
Ajit Pawar Letter To Amit shah : इथेनॉल निर्मिती बंदीवरून अजित पवारांचं अमित शाहांना पत्र
नागपूर : केंद्राने इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर बंदी लागू केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना (Amit Shah) पत्र लिहीलंय. इथेनॉल निर्मितीत 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक साखर कारखान्यांनी (Sugar Factory) केली आहे, इथेनॉल निर्मिती बंदी लागू केली तर कारखान्यांचं एवढं प्रचंड नुकसान होणार आहे याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलंय.सरकारने घेतलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी ऊसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय.
अजित पवार म्हणाले, ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे हा उद्योगच अडचणीत येतो आहे. सरकारने घेतलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी उसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा. केंद्र सरकारने बी हेवी इथेनॉलच्या किंमती ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याच्या इथेनॉलला द्याव्यात. सी दर्जाच्या इथेनॉलची किंमत बी हेवीच्या दर्जाची करावी यातून आर्थिक संतुलन साधता येईल.