एक्स्प्लोर
Mumbai Train Blasts | मुंबई लोकल स्फोटाच्या वेदनादायी आठवणी, बॉम्बस्फोटात जखमी प्रभाकर मिश्रा 'माझा'वर
11 जुलै 2006 रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये साखळी स्फोट झाले. या घटनेत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सात वेगवेगळ्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये हे स्फोट झाले. चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये ग्रांट रोड स्टेशनवर प्राध्यापक प्रभाकर मिश्रा चढले. माटुंगा आणि माहीम दरम्यान त्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा ते दाराजवळ उभे होते. स्फोटानंतर ते खाली पडले आणि अनेक मृतदेहांखाली गाडले गेले. मात्र, ते या भीषण घटनेतून बचावले. या घटनेमुळे त्यांच्या डाव्या कानाची ऐकण्याची शक्ती पूर्णपणे गेली, तर उजव्या कानावरही परिणाम झाला. प्राध्यापक प्रभाकर मिश्रा यांनी त्यांच्या अनुभवाविषयी सांगितले की, "मला वाटलं माझ्या फोनची बॅटरी ब्लास्ट झाली. एका क्षणात मी खाली पडलो. तेव्हा काहीच कळलं नाही. नंतर कळलं की मला मृतदेहांमधून बाहेर काढण्यात आलं होतं." आजही त्यांना डाव्या बाजूने काही ऐकू येत नाही, ज्यामुळे त्यांना रस्त्यावर चालताना रिक्षा किंवा इतर वाहनांच्या आवाजाची भीती वाटते आणि आणखी एखादा अपघात होण्याची शक्यता वाटते. प्राध्यापक प्रभाकर मिश्रा यांच्याप्रमाणेच, त्या साखळी स्फोटांचे शेकडो पीडित आणि त्यांचे कुटुंबीय आजही त्या घटनेचे दुःख आणि परिणाम सहन करत आहेत.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















