एक्स्प्लोर
Mumbai Rains | मुंबईला Red Alert, रेल्वे वाहतूक विस्कळीत; अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज मुंबईला तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि रायगडमध्ये पुढील चोवीस तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला असून, मध्य रेल्वेच्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत, तर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे. सकाळी साडेआठपर्यंतच्या आकडेवारीनुसार, फुलाब परिसरात १३४.४ मिमी, सांताक्रूझमध्ये ७३.२ मिमी, माथेरानमध्ये २७१.४ मिमी, नवी मुंबईत ८२ मिमी, पुण्यात ६० मिमी, बारामतीमध्ये ५२ मिमी, महाबळेश्वरमध्ये ७३.५ मिमी, रत्नागिरीमध्ये ६०.६ मिमी, बीडमध्ये ७२.६ मिमी, अहिल्यनगरमध्ये २२ मिमी, परभणीमध्ये ४३ मिमी आणि उदगीरमध्ये ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















