Mumbai New Year Celebration : रामराम 2023, नमस्कार 2024 ; नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळं गजबजली
२०२३ साल हा हा म्हणता संपत आलं... २०२३ या वर्षाने आता पाठ फिरवलीय... या वर्षाचा शेवटचा सूर्य मावळला आणि अवघ्या जगाला वेध लागले ते, १ जानेवारी २०२४ च्या पहाटेचे... अंधाऱ्या रात्रीच्या पोटातून, सोनेरी किरणं उगवतील आणि जुने जाऊ द्या मरणालागूनी म्हणत, प्रत्येकजण या झळाळत्या तांबूस किरणांत न्हाऊन निघेल... मात्र हे सगळं होत असताना, मनात पुढील वर्षाच्या संकल्पनांची, स्वप्नांची आणि ध्येयांची कुपी प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेली आणि सजलेलीही असेल. खरंतर, २०२२ सालाच्या सुरूवातीला अभूतपूर्व अशा कोरोनाच्या संकटाने माघार घेतली, अर्थात, अधे-मध्ये कोरोना कुठेतरी डोकं वर काढतो. मात्र, कोरोनाच्या काळ्याकुट्ट संकटाच्या ऐन मध्यावर प्रत्येकाने लढलेली संयमाची, शिस्तीची लढाई, अनुभव म्हणून आपल्या गाठीशी आहे. त्याच अनुभवाच्या शिदोरीवर आपण पुढीलही संकटं लिलया परतवून लावू हा विश्वास आहेच. म्हणूनच, भूतकाळातला अनुभव न विसरता, प्रत्येकजण वर्तमानकाळात मोठ्या विश्वासाने पाय रोवून उभा राहिलाय. आणि हे करताना येत्या भविष्यासाठी सज्जही झालाय. परिवर्तन हा जगाचा अटळ नियम आहे. त्यामुळे, भिंतीवरील कॅलेंडर बदलेल... त्यावरील २०२३ सालाचा आकडा बदलेल आणि २०२४ हे आकडे दिसू लागतील. जे नवी उमेद, नवी आशा आणि पुढील वाटचालीसाठी भक्कम ऊर्जा बहाल करतील. या अपेक्षेसह आपण नव्या वर्षात प्रवेश करूया. आणि, प्रत्येकाच्या भवतालावर सुखाची, प्रत्येकाच्या मनावर सकारात्मकतेची तोरणं लागावीत. तसेच प्रत्येकाच्या वाटेवर आनंद आणि प्रगतीचं शिंपण होत राहो... याच शुभेच्छा...
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)