(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो-2 आणि मेट्रो 7चा पहिला टप्पा उद्घाटनासाठी तयार
मुंबईकरांसाठी एक मोठी खूशखबर आहे.... लवकरच मेट्रो-2 आणि मेट्रो 7चा पहिला टप्पा सुरु होणार असून, उद्घाटनासाठी एमएमआरडीएनं तयारी सुरु केली आहे... मेट्रो 2A मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते आरे आणि मेट्रो 7 मार्गातील दहिसर ते आरे या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय. त्यामुळे येत्या दहा दिवसात या दोन्ही मेट्रोचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुकर होणार आहे. दुसरीकडे देशात दहा वर्षांपूर्वी जे शक्य वाटत नव्हते ते घडलंय. नागपुरात मेड इन इंडिया मेट्रो कोच तयार झालेत. अॅल्युमिनियम धातूपासून तीन कोचेस असलेली महामेट्रो पुण्याला रवाना झालीय. 2015 मध्ये नागपूर मेट्रोसाठी कोचेस निर्माण करणारी भारतात एकही कंपनी नव्हती.मात्र आता देशात कोचेस निर्माण झाले. या नवनिर्मित अॅल्युमिनियम कोचसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांत वापरलेले अनेक सुटे भाग देशातच तयार झालेत.