एक्स्प्लोर
Mumbai Local Train Capacity | पंधरा डब्ब्यांच्या लोकल फेऱ्या तिप्पट होणार, गर्दी कमी होणार!
मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून लवकरच पंधरा डब्ब्यांच्या ट्रेन्सच्या फेऱ्या तिपटीने वाढवण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर पंधरा डब्ब्यांच्या लोकलच्या बावीसेक फेऱ्या होतात. या फेऱ्या साठ ते सत्तरवर नेण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. या सर्व जलद लोकल असतील. "या सुविधेनंतर प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता ही पंचवीस टक्क्यानं वाढणार आहे." मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्याचा हा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे, ज्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यावर उपाय म्हणून सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. पाच आणि सहा नंबरचा संयुक्त प्लॅटफॉर्म वाढवला जाईल. यासाठी समोरची सफेद रंगाची बिल्डिंग पाडली जाईल. नवीन रूळ टाकले जातील. तीन आणि चार नंबरचा प्लॅटफॉर्म देखील पंधरा डब्ब्यांच्या लोकलसाठी वाढवला जाईल. मध्य रेल्वे गर्दी सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
महाराष्ट्र
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















