Mumbai: मुंबईत 500 Sq फुटाखालील घरांसाठी मालमत्ता करमाफ झाल्यानंतर इतर शहरांकडूनही करमाफीची मागणी
५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना नववर्षाचं गिफ्ट दिलं. मुंबईत करमाफी झाल्यानंतर इतर शहरांकडूनही अशीच मागणी होऊ लागलीय. सर्वात आधी उपराजधानी नागपुरातून ही मागणी समोर आलीय. नागपुरातील ५०० चौ.फुटाखालील घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलीय. माजी आमदार आशिष देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. नागपुरात ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ केल्यास आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला न्याय मिळेल असं देशमुख यांनी या पत्रात नमूद केलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतायत याकडं लक्ष लागलंय.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)