MNS Protest : Mumbai Goa Highway ची दुरावस्था, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची पदयात्रा
MNS Protest : Mumbai Goa Highway ची दुरावस्था, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेची पदयात्रा
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा. २३ ते ३० ऑगस्ट मुंबई गोवा महामार्गावर मनसेची पदयात्रा. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा असणार. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार. या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था जनता आणि शासना समोर मनसे कडून मांडण्यात येणार. नुकत्याच पनवेल इथे झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विविध प्रकारचे आंदोलन या मुद्द्याला घेऊन करण्याचे आदेश दिले होते. तीन टप्प्यात ही यात्रा असेल पहिले दोन टप्पे ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात गाव जनजागृती अभियान मनसे च्या वतीने राबविण्यात येईल.



















