एक्स्प्लोर
Maharashtra Politics: ‘नवीन भिडू नको’, MVA मध्ये MNS च्या एन्ट्रीला काँग्रेसचा थेट विरोध.
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) महाविकास आघाडीतील (MVA) प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यासाठी प्रयत्नशील असताना, काँग्रेस (Congress) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मात्र विरोधाचा सूर आळवला आहे. काँग्रेसने तर ‘इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा होऊ शकते, कुठलाही नवीन भिडू नको’, अशी थेट भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेच्या संभाव्य प्रवेशाला विरोध दर्शवला आहे, तर दुसरीकडे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी मनसे सोबत आल्यास फायदा होईल, असे मत मांडले आहे. यामुळे महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशावरून अंतर्गत मतभेद स्पष्ट दिसत असून, शरद पवार अंतिम काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















