एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
MLA Funds Controversy | माजी MLA सदाशिवरकरांना 20 कोटी, विद्यमान MLA ना 2 कोटी? ED चौकशीची मागणी
राज्यातील निधी वाटपावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे माजी आमदार सदाशिवरकर यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "असलेल्या आमदाराला दोन कोटी मिळाले तर मला नसतानाच वीस कोटी मिळतंय." या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पराभूत होऊनही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे हा निधी मिळत असल्याचा विश्वास सदाशिवरकर यांनी व्यक्त केला. आमदार नसतानाही सदाशिवरकरांना वीस कोटींचा निधी कसा मिळाला आणि तो कसा खर्च केला जाणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर स्थानिक आमदार महेश सावंत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ही पद्धत चुकीची असल्याचे सांगत, त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे म्हटले आहे. महेश सावंत यांनी विद्यमान आमदारांना चाळीस कोटी निधी देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निधीचा वापर जनतेच्या कामासाठी होतो की वैयक्तिक लाभासाठी, याची ED चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवडून आलेल्या आमदारांना निधी मिळत नसताना पराभूत आमदारांना निधी का, असा सवालही सावंत यांनी उपस्थित केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
पुणे
Advertisement
Advertisement


















