एक्स्प्लोर
Farmer Aid Row: 'शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही', मंत्री Makarand Patil यांचा दावा; प्रशासनासोबत खडाजंगी
शेतकऱ्यांना सरकारी मदत वाटपाच्या मुद्द्यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि प्रशासनामध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. 'सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही,' असा थेट आरोप मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे. याउलट, मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मदत मिळालेली नाही, असेही मंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला असून, आजच या संदर्भात आढावा बैठक घेऊन नेमकी किती मदत पोहोचली आहे, याची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीनंतरच मदतीच्या वाटपाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















