Dr Bharati Pawar : Omicron विषाणू किती घातक? आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार EXCLUSIVE
Omicron Guidelines : देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) चे संकट वाढतच चालले आहे. देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 578 झाली असून आकडा अद्यापही वाढतो आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2 डिसेंबरपर्यंत रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. राजधानी दिल्लीमध्येही सरकारने नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केलीय. 27 डिसेंबरपासून दिल्लीमध्ये रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
महत्त्वाच्या बातम्या





















