एक्स्प्लोर
Marathwada Floods | फाटलं आभाळ, अतिवृष्टीने घायाळ; दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 'अश्रूंचा महापूर'
मराठवाड्यात गेल्या आठवडाभरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसाने झोडपून काढले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. शिरूर कासार भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला, ज्यामुळे घरे आणि बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या. सिंदफना नदीला पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी शिरले. माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आणि बासष्ठ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील लाखी गावात लोकांना घराच्या छतावर आसरा घ्यावा लागला, त्यांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले. परंडा तालुक्यातील देवगावमध्ये लष्कराच्या जवानांनी बोटीने चोवीस लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. जालन्यातही अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. वाघोळा गावात एका गर्भवती महिलेला खांद्यावर उचलून दवाखान्यात नेण्यात आले. शेतीत गाळ साचला असून सोयाबीन आणि तोरीची पिके वाहून गेली आहेत. एका नागरिकाने शासनाला विनंती केली, "आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की माझं घर पण हे आहे का आहे, माझा सगळा संसार ह्यात आता सध्या पाण्यात आहे, मी कपड्यांनी कशी फक्त बाहेर निघालेला आहे. फक्त शासनाला एवढीच विनंती की आमच्या गरिबांचे घरं उभारावीत आणि आम्हाला काहीतरी मदत मिळावी." नऊशे पेक्षा जास्त गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















