एक्स्प्लोर

Manoj Jarange Full Speech Beed : Dhananjay Munde, Pankaja Munde वर हल्लाबोल, छगन भुजबळही टार्गेट

Manoj Jarange Full Speech Beed : Dhananjay Munde, Pankaja Munde वर हल्लाबोल, छगन भुजबळही टार्गेट राज्याचं लक्ष लागलेल्या बीडमधील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची रॅली शांततेत पार पडली, आणि जरांगे पाटील यांच्या भाषणाने गाजली. बीडमधील (Beed) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरुन जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकार आणि विरोधक दोघांवरही हल्लाबो केला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal), बीडमधील मुंडे बंधु-भगिनींवर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वांनाच बीडमधून फैलावर घेतल्याचं दिसून आलं. यावेळी, लोकसभा निवडणुकीत मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. केवश, ज्याला पाडायचंय, त्याला पाडा असं म्हटलं होतं. मात्र, आता विधानसभेला नावं घेऊन सांगणार आहे, ह्याला पाडा म्हणून, असे जरांगे यांनी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणुकांसाठी दररोज 50 जण माझ्याकडे तिकीट मागायला येतात असेही जरांगे म्हणाले.    जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.   महाविकास आघाडीवर हल्लाबोल मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागतं का, असे म्हणत मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला, तसेच, हिंडू द्या त्यांना, वड्यावगळ्यानी कुठं हिंडायचंय ते. मला तर वाटतंय हे दोन्हीही एकच आहेत. कारण, तू मारल्यावनी कर, मी रडल्यावनी करतो, असंच यांचं काम दिसतंय. दोघेही एकमेकांवर का ढकलतात. जर महाविकास आघाडीवाले आले नाहीत, मग सरकारची इच्छाशक्ती असेल तर सरकार का करत नाही?. महाविकास आघाडी असू किंवा महायुती असो, कधीतरी जनतेकडे बघा. ते नाही आले म्हणता, मग तुम्ही का दिलं नाही. तुमचीच इच्छा नाही आम्हाला आरक्षण द्यायची, असे जरांगे यांनी म्हटले.   शिंदे-फडणवीसांना जरांगेंचा सवाल टेम्पो रिक्षावर असलेल्या मराठ्यांना वाटतं माझा मुलगा नोकरी करावा, माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना माझा सवाल आहे, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायचं नाही का?. शिंदेसाहेब तुम्हालाही सांगतो, आमचे आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा बांधवांचा एकदा उंबरा ओलांडला, तुम्हाला काळोख आणि काळोखच दिसेल, असे जरांगे यांनी म्हटले. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावं, यासाठी मुलांनी, बापांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आया-बहिणीचं कुंकू पुसलंय. घरातला माणूस गेला, आरक्षणाने घात केला, उभा संसार जाळात होरपळतोय, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यकर्त्यांना सवाल केला आहे.   कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीत का नाही? तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि तुम्हाला हवं तेच करणार. 83 क्रमांक हा कुणबी म्हणून आहे. ओबीसीमध्ये 180 जाती होत्या, पण आता 350 च्या जवळ जाती आहेत, ज्या जाती पोटजाती म्हणून ओबीसीमध्ये घेतल्या आहेत. मग, मराठा समाजालाही ओबीसीत का घेत नाहीत, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget