एक्स्प्लोर
Majha Maharashtra Majha Vision | राज्याची रिकामी तिजोरी कशी भरणार? उद्योग मंत्री सुभाष देसाई माझावर
"51 हजार कोटींच्या सामंजस्य करारातून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर सुरु होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग सुरु होत आहेत. रायगडमध्ये औषध कंपन्या सुरु होत आहे. औरंगाबादमध्येही अन्नप्रक्रिया सुरु होत आहे. पुण्यातील हिंजवडी, चाकण, पनवेलमध्येही उद्योग येत आहेत," अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
सुभाष देसाई म्हणाले की, "उद्योगविश्व सुरु होत आहे, 70 आणि 80 टक्क्यांनी उद्योगांची चक्र सुरु झाली आहेत. काही उद्योग संपूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. जुन्या उद्योगांसह नवे उद्योग सुरु करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. रोजगाराची चिंता घराघरात आहेत. सामंजस्य करारावर नजर टाकली तर सर्वत्र उद्योग येत आहेत. त्याच्या माध्यमातून रोजगार वाढावा असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही 20-30 कंपन्यांसोबत 51 हजार कोटींचे सामंजस्य करार केले, त्यामधून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत."जीएसटीचा वाटा केंद्र सरकारने द्यायला हवा. आपत्तीच्या काळात राज्यांना मदत करणं हे राज्याप्रमाणे केंद्राचंही कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्य यांनी एकत्रितपणे नुकसानग्रस्तांना आणि अडचणीत असणाऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे," असंही सुभाष देसाई म्हणाले.
#MarathiNews #ABPMajha #ABPMajhaLiveNews
महाराष्ट्र
वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहिती
TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan Attacked
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025
Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement