Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 30 May 2024
राज्यात मोठ्या प्रकल्पात केवळ १९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात तीव्र टंचाई
राज्यात ११ हजार वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाई, धरणांनी गाठला तळ, टँकरच्या संख्येने गाठला उच्चांक, तब्बल २५ जिल्ह्यात भीषण स्थिती
येत्या ४८ तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता, राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता
मध्य रेल्वेवर १ आणि २ जूनला महामेगाब्लॉक..शुक्रवार ते रविवार दरम्यान लांब पल्ल्याच्या ७२ एक्स्प्रेस रद्द, सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणासाठी ३६ तासांचा ब्लॉक..
महाडमध्ये आंदोलन करताना आव्हाडांकडून डॉ.आंबेडकरांचा फोटो असलेलं पत्रक फाटलं, आव्हाडांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, आव्हाडांच्या माफीनाम्यानंतरही भाजप आज राज्यभरात आंदोलन करणार
ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर, पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात वैद्यकीय शिक्षण विभागाची मोठी कारवाई, डॉ. अजय तावरेही निलंबित
पुणे अपघातप्रकरणात खळबळजनक माहिती, अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेचं रक्त तपासणीला पाठवल्याचं अहवालात नमूद, रक्त मुलाच्या आईचं असल्याचा संशय
लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार, १ जूनला अखेरच्या टप्प्यात ८ राज्यात ५७ जागांवर मतदान, ४ जूनला एबीपी माझावर महानिकाल
भुसावळमध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंवर अंदाधुंद गोळीबार, गोळीबारात बारसेंसह सहकाऱ्याचा मृत्यू, पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची पोलिसांची माहिती
हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रूद्र एम २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, सुखोई ३० एमके आयसाठी नवी क्षेपणास्त्र प्रणाली