(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024
कोल्हापुरातील राधानगरीमधील नरतवडे गावच्या खासगी निवासी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, क्लास चालकाच्या वडिलांनी केले कृत्य, आरोपी पोलीसांच्या अटकेत.
रायगडच्या माणगाव कचेरी रोडवर भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक, अपघातात दोघे जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद.
आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या जरांगेंचं उपोषण.
गपणती विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु, कोकणातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी, कोकण रेल्वेवर धावणाऱ्या हॉलिडे एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद.
बीडच्या परळीमध्ये बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षकाकडून १२ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग, शिक्षक साजिद सलीम शेखविरोधात पोक्सो अंतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, मूर्तींच्या विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात
पुण्यात विसर्जनासाठी पीएमपीएलकडून बसचं नियोजन; रस्ते बंद असल्याने गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलकडून बसची व्यवस्था.