(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Gao Majha Jilha : माझा गाव माझा जिल्हा : जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा 6. 30AM 20 August 2024
Majha Gao Majha Jilha : माझा गाव माझा जिल्हा : जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा 6. 30AM 20 August 2024
राज्यातील वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री वयोश्री' योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आता महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या योजनेत एकवेळ एकरकमी तीन हजार रुपये बँक खात्यात देण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना सामान्य जीवन जगता यावे, योगोपचार, मनःस्वास्थ केंद्र याद्वारे मनःस्वास्थ जपता यावे, अपंगत्व, वयोमानानुसारचा अशक्तपणा यादृष्टीने उपकरणे साधने घेता यावीत, यासाठी तीन हजार रुपये या योजनेद्वारे देण्यात येतात. यासाठी लाभार्थ्यांचे अर्ज, बँक खाते, आधार कार्ड व अन्य कागदपत्रे गोळा करण्याची जबाबदारी एखादी संस्था किंवा एजन्सीकडे सोपविण्याचे प्रस्तावित होते. पण आता ही जबाबदारी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे देण्यात आली आहे.