Shinde vs Thackeray : व्हिप संदर्भात एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी Sunil Prabhu यांना घेरलं
आमदार अपात्रताप्रकरणी आजच्या सुनावणीतही सुनील प्रभूंची साक्ष होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी अनिल साखरे आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे विधानभवनात पोहोचले आहेत. सुनील प्रभू सुद्धा विधानभवनात आले थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. २१ जूनच्या बैठकीसाठी बजावलेल्या व्हिपवरून काल दिवसभर प्रभूंना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी घेरलं. व्हिप बजावण्यातच आला नव्हता असा दावा काल सुनावणीदरम्यान महेश जेठमलानींनी केला. त्यावर उत्तर देताना प्रभूंनी तो दावा फेटाळला. आता आजच्या उलटतपासणीतही या व्हिपच्या सत्यतेवरूनच प्रश्नांचा रोख राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुनावणीच्या संथगतीवर काल विधानसभा अध्यक्षांनी नाराजीही व्यक्त केली होती.



















