Mahayuti PC : भाऊंची आश्वासनं, दादा-भाईंचे टोले, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फटकेबाजी ABP MAJHA
Mahayuti PC : भाऊंची आश्वासनं, दादा-भाईंचे टोले, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फटकेबाजी ABP MAJHA
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील (Nagpur) राजभवन येथे संपन्न होत असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. मी ... ईश्वर साक्ष शपथ घेतो की, असे म्हणत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.
राज्यातील महायुती सरकारमधील 39 मंत्र्यांचा शपथविधी आज नागपूर येथील राजभवनमध्ये संपन्न झाला. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी मुंबईत संपन्न झाला होता. त्यानंतर, सर्वांचं लक्ष लागलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच मुहूर्त अखेर आज संपन्न झाला. त्यानुसार, 4 लाडक्या बहिणींसह 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर होते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखी या मंत्रिमंडळा विस्तार सोहळ्याला उपस्थित होते.