Mahayuti Madhav Pattern : काय आहे महायुतीचा मा-ध-व पॅटर्न?प्रमुख जातींची एकजूट म्हणजे 'माधव' पॅटर्न
Mahayuti Madhav Pattern : काय आहे महायुतीचा मा-ध-व पॅटर्न?प्रमुख जातींची एकजूट म्हणजे 'माधव' पॅटर्न
राज्यातील आरक्षणाची परिस्थिती पाहता मराठा ओबीसी धनगर समाज सध्या प्रचंड आक्रमक आहे. या समाजांना शांत करायचा असेल तर या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेवर पाठवायला हवेत असा प्लॅन महायुतीच्या वतीने करण्यात आला होता. हा प्लॅन आता इम्प्लिमेंट झाल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये माधव पॅटर्न अर्थात माळी-धनगर-वंजारी या समाजाच्या नेत्यांची वर्णी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लागली आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर परिचित असून ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. तर वंजारी समाजाच्या नेतृत्व असणाऱ्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत तर माळी समाजाचा राज्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जातं ते छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात असल्याची माहिती समोर आली आहे.