Maharashtra Unlock : 25 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल होण्याची प्रतिक्षा कायम, 4 दिवसांनंतरही अधिसूचना नाहीच
तिसऱ्या लाटेचा इशारा, डेल्टा व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आलीय. राज्यातील १२ जिल्हे आणि १२ महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. काल दिवसभरात कोरोनामुळे राज्यात १५७ जणांचा मृत्यू झाला. मात्र १२ जिल्हे आणि १२ महापालिका क्षेत्रातून दिलासा देणारी आकडेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केलीय. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात ६ हजार ४७९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झालीय. तर ४ हजार ११० रुग्णांनी कोरोनामुक्त झालेत. ही आकडेवारी दिलासा देणारी असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.





















