(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 11 September 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 11 September 2024 : ABP Majha
शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर, उद्या नवीन सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता,
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी १३ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरण, सह आरोपी चेतन पाटीलच्या जामिनावर 13 सप्टेंबरला सुनावणी
शक्तीपीठ महामार्ग पाठोपाठ आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलं,
राज्यातील RTO कर्मचारी २४ सप्टेंबरपासून संपावर जाणार, सुधारित आकृतीबंधाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक.
टोलसाठी जीपीएसचा वापर केला जाणार, त्यासाठीच्या नव्या टोल सिस्टमला केंद्राची मंजुरी, उपग्रहाद्वारे तुमचे टोलचे पैसे कापले जाणार.
GNSS सिस्टीम असलेल्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्स्प्रेस- वेवर दररोज २० किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार, २००८ मधील राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमात दुरुस्ती करत केंद्राकडून नवा अध्यादेश जारी.