Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha 19 Jully
१० तास उलटले तरी मायक्रोसॉफ्ट विंडोजचं सर्व्हर डाऊनच, जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा, स्पाइसजेट, अकासाची विमानसेवांना फटका, तर इंडिगोची २०० विमानं रद्द
सर्व्हर डाऊनमुळे मायक्रोस्फॉटला मोठा फटका, २३ अब्ज डॉलरचं नुकसान, शेअरची किंमतही ०.७१ टक्क्यांनी घटली
समाजवादी पक्षाच्या खासदारांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन तर चैत्यभूमीलाही दिली भेट... विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवता समाजवादी पार्टीच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व..
मेट्रोच्या खर्चावरुन एमएमआरडीए आणि महानगरपालिकेत जुंपली..एमएमआरडीएकडून पालिकेवर ३००० कोटी देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा रवी राजा यांचा आरोप...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक,निधी फक्त कागदावरचा राहतो म्हणत केली कागदपत्रांची फाडाफाड..
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ३९ टक्के पाणीसाठा.. दोन दिवसांत पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ.. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठ टक्के पाणीसाठा जास्त
इंद्राणी मुखर्जीला परदेशात जाण्यासाठी सशर्त परवानगी..पुढील ३ महिन्यात १० दिवसांकरता स्पेन किंवा इंग्लंडमध्ये जाता येणार...
गणपतीला कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांची घोषणा...पहिल्या टप्प्यात २०२ गाड्या सोडणार तर
२१ जुलैपासून आरक्षण करता येणार..
भारताची पाकिस्तानला नमवून महिला आशिया चषकात विजयी सलामी.. भारतीय महिलांकडून पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा..