Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP Majha
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP Majha
पुण्याच्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री झाल्याचा संशय, एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल.
पुण्याच्या लिक्विड लाऊंज हॉटेलमध्ये मध्यरात्री ३ वाजता तरुणांकडून ड्रग्जचं सेवन, हॉटेलच्या मॅनेजरसह एक कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लिक्विड लाऊंज हॉटेलमधील पार्टीचा तपास सुरू, पोलिसांकडून संपूर्ण हॉटेलची तपासणी.
पुण्यात ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली त्यावर कारवाई होणार, तसंच पोलीस ठाण्यातील जे कर्मचारी रात्री या भागात गस्तीवर होते ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती.
जिथे ड्रग्ज सापडेल तिथे कारवाई करणार, पेडलर्सनाही सोडणार नाही, ड्रग्जमुक्त महाराष्ट्र होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य.
पुण्यातील ड्रग्जप्रकरणात मंत्री शंभुराज देसाईंचा हात, रविंद्र धंगेकरांचा आरोप.
शंभूराजे देसाई हे राज्य उत्पादन शुल्क सांभाळायला अत्यंत अकार्यक्षम ठरले, त्यांनी तात्काळ आपल्या खात्याच्या पदाचा राजीनामा द्यावा, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी.