Maharashtra School Reopen : Nashik मध्ये पुष्पवृष्टी करत मुलांचं शाळेत स्वागत ABP Majha
आजची सकाळ राज्यातल्या बहुतेक घरांमध्ये जरा जास्तच लगबगीची होती कारण. घरच्या चिल्ल्यापिल्ल्यांचा शैक्षणिक वर्षातला आज पहिला दिवस. जवळपास महिनाभराच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून बच्चेकंपनीनं आज पुन्हा शाळेचा रस्ता धरला. आजपासून राज्यातल्या पहिली ते दहावीच्या शाळा सुरू झाल्यात.. दप्तर, डबा, वॉटरबॅग सावरत आपल्या मित्रगणांना भेटण्याच्या आनंदात आज बच्चे कंपनीनं शाळा गाठली... आजच्या दिवशी अनेक चिमुकल्यांचं औपचारिक शिक्षण प्रवाहात पहिलं पाऊल पडलं. हे पहिलं पाऊल दमदार आणि सुखावह होण्यासाठी राज्यभरातील शाळाही सज्ज होत्या. कुठे बच्चेकंपनीवर पुष्पवृष्टी झाली, कुठे लेझीमच्या तालावर ठेका धरला,, कुठे मुलांचे लाडके कार्टून कॅरॅक्टर्स मुलांच्या स्वागताला हजर होते... कुठे पेढे भरवून चिमुकल्यांचं तोंड गोड करण्यात आलं.
नाशिकच्या रचना विद्यालयातून आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी...