Maharashtra : मंत्रिमंडळाचा विस्तार ते मध्यरात्री बैठक; शिंदे-फडणवीस-दादांमध्ये काय चर्चा?
CM, DCM Meeting At Varsha Bungalow: मुंबई : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political Updates) चाललंय तरी काय? असा प्रश्न काल (सोमवारी) रात्रीपासून सर्वांना पडला आहे. याचं कारणंही तसंच आहे. काल (सोमवारी) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी (Varsha Bungalow) एक बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) थेट नागपुरातून (Nagpur) पोहोचले होते. तब्बल दीड तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं? याबाबत मात्र, काहीच माहिती मिळालेली नाही.
काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा दीड तास बैठक झाली. या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते. त्याचवेळी नागपूरहून मुंबईत दाखल झालेले देवेंद्र फडणवीस थेट वर्षा निवासस्थानी दाखल झाले. वर्षावर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. थोड्यावेळानं अजित पवार चर्चा संपवून निघाले. मात्र अजित पवारांनंतर फडणवीसांची रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंशी खलबतं सुरू होती. दरम्यान, आज भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाची राज्यातले नेते भेट घेणार आहेत. फडणवीसही राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतील. दरम्यान फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं होण्याच्या मागणीवर भाजप नेते काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकी