Maharashtra paper leak : नोकरभरती पेपरफुटीच्या प्रकरणात औरंगाबादमधून एकाला अटक ABP Majha
नोकरभरती पेपरफुटी प्रकरणाचा पर्दाफाश एबीपी माझानं केल्यानंतर आता अटकसत्र सुरू झालंय. आरोग्य विभागाच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी औरंगाबादमधून विजय मुराडे याला अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं मुराडे याला अटक केलीय. आरोग्य विभागाच्या ३१ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता झालेल्या परीक्षेचा पेपर सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनीच विजय मुराडेला व्हॉट्सअॅपवर मिळाला होता. विजय मुराडेनं तो पेपर इतरांना फॉरवर्ड केला होता. विजय मुराडे हा औरंगाबादमधे तरुणांना वेगवेगळ्या कार्यालयांमधे नोकरी लावून देतो असं सांगून एजंट म्हणून काम करत होता. पोलीसांच्या भितीने औरंगाबादमधील एका हॉटेलमधे लपून बसलेल्या विजय मुराडेला पोलीसांनी सापळा रचून अटक केली.
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d9ea52f1dec8b44d46b9fec7346122601739901030954977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d877e01e65ffa6ad741d16fb30b06fd71739886484727977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/317ce4712984847b3864b7b10235449d1739884286047977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संताप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/2a247cc6697d594b2f91b2c8844dc83b1739879233835977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f65ce86b980e3b8da7e5336ea09ecb1a1739878805790977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)