एक्स्प्लोर
Loan Waiver Row: 'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय', सहकार मंत्री Babasaheb Patil यांच्या वक्तव्याने नवा वाद
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी कर्जमाफीवरून (Loan Waiver) केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय,' असं विधान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी जळगाव (Jalgaon) येथील एका कार्यक्रमात केलं. या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका होऊ लागताच पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं म्हणत त्यांनी माफी मागितली. या प्रकरणानंतर महायुती (Mahayuti) सरकारमधील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्जमाफी हे महायुतीच्या जाहीरनाम्यातील आश्वासन असून, पात्र शेतकऱ्यांना ती दिली जाईल, असं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना वादग्रस्त विधानं टाळण्याच्या सक्त सूचना दिल्या असल्याचंही काही नेत्यांनी सांगितलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















